9 Quotes by Sonal Takalkar about marathi

  • Author Sonal Takalkar
  • Quote

    माणूस नावाच्या प्राण्याला देवाने बुद्धी काय प्रदान केली,विविध शोधाशोधीच्या नादात माणसाने मात्र तिची रयाच नष्ट केली,कलाकुसरीची निवड करताना त्याची माणुसकी शुद्ध भान विसरली,निर्विवाद दातृत्वाच्या देयलाही त्याने पैशाची ठिणगी लावली.

  • Tags
  • Share

  • Author Sonal Takalkar
  • Quote

    जगाच्या बाजारात कलागुणांना विकून पैसे मिळत असेल तर कदाचित कुठेच नाही बसत मी ह्या जगात. पण फक्त जगण्यासाठी कलागुणांना विसरून वाट्याला आलेली फरफड कधीच मान्य नाही.

  • Tags
  • Share


  • Author Sonal Takalkar
  • Quote

    कर्ण म्हणाला,"अर्जुनाने पक्ष्याचा एक डोळा दिसतोय ह्या लक्ष्य केंद्रित उत्तराने गुरु द्रोण प्रभावित झाले. पण अश्वत्थामा! जर मला विचारशील तर मी पक्षाचे दोन्ही डोळे एकाच बाणात साधण्याची उपासना केली आहे."त्यावर अश्वत्थामा म्हणाला," कर्ण!असेलही अर्जुन जगासाठी उत्तम धनुर्धर! पण मी आजपर्यंत भुंकणाऱ्या कुत्र्यांच्या पलीकडचा मंजुळ कोकिळेचा आवाज ऐकून लक्ष्य साधणारा धनुर्धर कधीच पहिला नाही. ज्या गुरूने तुला विद्यादान करण्यास नकार दिला त्या गुरुचाच अभेद्य अंश आज तुझा अजन्म मित्र राहील.

  • Tags
  • Share


  • Author Sonal Takalkar
  • Quote

    घरकुलासाठी सखा माझा करी वणवण, कधी पैशांची माघार कधी भावनांचा शिन,विरहाच्या सोबतीला कधी आसवांचे क्षण, हसू कसे आणू तिथे जिथे जड झाले मन,माझ्या सख्याच्या डोळ्यात दिसे आशेचा किरण, म्हणे जगाला जिंकून येतो घरी परतून,धीर देई मला त्याच्या डोळ्यांची ताठर पापणी, नको मला जगसुख जिथे साथ नाही तुझी,तुझ्या अबोल भाषेत गवसल्या किती सांजा, नको परतीच्या वाटा राहो सोबतीचा खुणा,जिथे घाम शिंपतो पाणी चार भिंतींना घराच्या, तिथे येते धन धान्य आणि सुखही नांदाया

  • Tags
  • Share


  • Author Sonal Takalkar
  • Quote

    एका स्त्री संकटांशी फक्त तिच्या अब्रुच्या वेशीपर्यंतच लढू शकते, एकदा का तिच्या अब्रूची लक्तरं वेशीवर टांगली गेली कि तिला फक्त आणि फक्त सहानुभूती मिळते.

  • Tags
  • Share

  • Author Sonal Takalkar
  • Quote

    गंगेकाठी "अर्घ्य "देताना कितीतरी मासे माझ्या पायांशी घुटमळायचे. अभेद्य कवचाला चिमुरड्या मुखाने ओरबाडायची चेष्टा करत. पण कधी त्या मातेने माझा तिरस्कार करून जगाच्या प्रवाहात कधीच सोडलं नाही.

  • Tags
  • Share